नाताळ [तळटीप.१] निमित्त २५ डिसें. ते ४ जाने. सुट्टी होती... हिवाळ्यात पॅरिसची हवा एकदम बेकार! ढगाळ हवा, पाऊस यांना कंटाळुन आम्हि कुठेतरी गरम ठिकाणी जायचे ठरवले. थोडा शोध केल्यावर स्पेनमधे बार्सिलोना आणि मॅद्रिद ला जायचे ठरले कारण या वेळेला तिथे १५ डि.से. तपमान आसते!! आहाहा... पॅरिसमधे ५ डि.से. मधे राहिल्यावर १५ पण सुखकर वाटते!! असो... तर नेटवरुन माहिती काढली... स्वस्तातली विमानाची तिकिटे काढली [तळटीप.२] आणि २५ तारखेची वाट पाहू लागलो...
प्रवासाची सुरवात तशी चांगली झाली नाही... २५डिसें.ला पॅरिस मधिल लांब पल्याच्या रेल्वे गाड्या (विमानतळावर जायला) संपावर गेल्या... तसे पॅरिस मधे संप चालु आसतात (आपल्यासारखे!!) पण संपात कमीत कमी ३० टक्के सेवा देणे त्यांना बंधनकारक आसते (आपल्यासारखे नाही!!). तरी कसेबसे(एकदाचे) विमानतळावर पोचलो! आता खरा प्रवास सुरु झाला!!
आता थेट बार्सिलोना...
बार्सिलोनाला पोचल्यावर बसने सिटि सेंटर गाठलं, त्या जागेचे नाव 'प्लेस कॅटॅलुनिया'. बसमधुन बाहेर पडल्या पडल्याच बार्सिलोना आवडलं... का? माहित नाही!! 'प्लेस कॅटॅलुनिया'हून बर्याच बसेस, मेट्रो, पर्यटक बसेस सुटतात. सगळीकडे नाताळ निमित्त सजावट आणि रोशणाइ केली होती. थोडं भटकून मॅक-डिमधे जेउन हॉटेलात जायला निघालो...
पॅरिसमधे राहिल्यामुळे मेट्रो काही नवीन नव्हती. तशी बार्सिलोनातली मेट्रो पॅरिस मेट्रोपेक्षा बर्याच बाबतीत चांगली निघाली. हॉटेल देखिल चांगलं होतं... खोलीत गेल्या गेल्या एक वेटर शॅम्पेनची बाटली आणि दोन ग्लास घेउन आला. मला आधी वाटलं चुकुन आमच्या रुम मधे आला कि काय! वेटरला विचारल्यावर समजलं की हॉटेल तर्फे वेलकम ड्रिंक म्हणून आहे... बापरे... माझ्या आयुश्यातली शॅम्पेनची बाटली उघडण्याची पहिलीच वेळ... (हो.. भारतात मी 'घेत' नाही.. पण.. व्हेन इन रोम...) घाबरत घाबरत... बाटलीवर टॉवेल टाकुन बाटली उघडली! आणि ते टोपण पुन्हा बसत नाही त्यामुळे दोघांनी मिळुन संपवून देखिल टाकली!! नंतर छान झोप लागली... थकलो होतो न आम्ही प्रवासामुळे... तुम्हाला काय वाटलं? शॅम्पेनमुळे?!!
दुसर्या दिवशी सकाळी परत 'प्लेस कॅटॅलुनिया'... बार्सिलोना तसं मोठं आहे. पर्यटन बसेसचे २ मार्ग आणि ४४ थांबे, कुठेही चढा-उतरा!!! आम्ही २ दिवसांचा पास काढला. २६ तारखेला सकाळपासुन पाउस चालू होता.. पण 'बार्सिलोनाचा' तो पाउस देखिल मला आवडला. तो जरा भारतातल्या पावसासारखा होता... विजा, ढगांचा गडगडाट, गरम हवा (१५ डि.से. बरंका)... पॅरिसमधे ही मजा नाही!! पण थोड्याच वेळातं हे कौतुक संपलं... कारण या पावसामुळे आम्हाला पर्यटन बसच्या वरच्या मजल्यावर (छत नसलेल्या) बसता येणार नव्हतं... जाउदे... तर अशा रितीने आमचं 'बार्सिलोना' दर्षन सुरु झालं.
थोडे 'बार्सिलोना' बद्दलः
'बार्सिलोना' ही 'कॅटॅलुनिया'ची राजधानी. कॅटॅलुनिया वर स्पेनने कित्तेक वर्षांपासुन राज्य केले आहे. कॅटॅलुनियाची वेगळी भाषा आहे. त्यामुळे 'बार्सिलोना' मधे सर्व ठिकाणी सुचना ३ भाषांमधे होत्या... स्पानिश, कॅटॅलुनियन आणि इंग्लिश!
'गॉडी'च्या इमारती:
'बार्सिलोना' प्रसिद्ध आहे ते म्हणजे ऍन्तोनिओ गॉडी ने डिसाइन (याला मराठीत काय म्हणतातं?!!) केलेल्या इमारती, रस्त्याशेजारचे दिवे आणि बाक यांसाठी. त्याच्या इमारती म्हणजे मुक्त छंदातल्या... मॉडर्न आर्ट... तरी दिसायला चांगल्या होत्या! इथल्या इमारतींचे वेगळेपण म्हणजे, बाल्कन्या...प्रत्येक इमारतीला पुढे आलेली बाल्कनी आसायलाच हवी! गॉडीने याचा चांगला वापर केलाय...
तिथुन पुढचा मुक्काम 'साग्राडा फॅमेलिआ' हे चर्च. ह्याला गॉडीचे स्वप्न म्हणतात. या चर्चचे बांधकाम १८८९ पासुन सुरु आहे... आत्तापर्यंत! पर्यटकांच्या देणग्या व तिकिट या उत्पन्नावर हे बांधकाम विसंबुन आहे. प्रत्यक्ष चर्च बाहेरुन एखाद्या भितिपटाचा सेट वाटतो...विचित्र, जरासे मॉडर्न पुतळे त्यात भर म्हणुन भिंतींवर उलट्या पाली, सरडे, साप आणि मगरं!! यामागे काय उद्देश आहे देव (किंवा येशु) जाणे!!!
हे चर्च बाहेरुन पाहुन आम्ही पुन्हा पुढच्या बसची वाट पाहू लागलो. दरम्यान पाउस वाढला होता, त्यामुळे छत्री खरेदी झाली... पुढचा थांबा होता 'टिबिडाबो हिल्स'... ह्या नावानिच मला वेडं केलं. (ते नावं पटापट म्हणा म्हणजे काळेल मी काय म्हणतोय ते...) या बस थांब्यापासुन पुढे जायला एक जुनी ट्राम आहे. तिथुन वरती डोंगरावर जायला 'फनिकुलर' आहे, डोंगरावर चर्च आणि मनोरंजन पार्क आहे. हे सगळ कळल्यावर उत्कंठा शिगेला पोचली होती. पण आमच्या नशिबात काही वेगळंच होतं......
घाबरु नका...
ती ट्राम त्या दिवशी बंद होती एवढंच.
मग पुढचा थांबा 'बार्सिलोना फुटबॉल क्लब'.. पण आरेरे.............
क्लबपण त्या दिवशी बंद.
मग काय परत बसमधे. आता संध्याकाळ झाली होती. पाउस बंद झाला होता, आम्हि बसच्या वरच्या मजल्यावर बसुन 'बार्सिलोना'चे निरिक्षण करत होतो. तेथिल इमारतींचे आजुन एक वैशिष्ट म्हणजे इमारतीचे कोपरे गोलाकार आसतात. आणि प्रत्येक इमारत वेगळी पण दिसायला सुरेख! पॅरीसमधे सर्व एमारती दिसायला एकसारख्या... पॅरिसमधे इमारती सोडा, सगळी माणसं पण एकसारखी, कपड्यांचा काळा हा एकच रंग, पॅरिस मेट्रोमधे बघितलं तर सर्वजण गाणी एकत नाहितर पुस्तक वाचत आसतो... याउलट 'बार्सिलोना'मधे इमारतिप्रमाणे मेट्रोतील माणसेही वेगवेगळी...
तर, त्या दिवशी रात्री मत्सालय पाहायचे ठरले. ते ही उत्तम ठरलं... सरकत्या पट्टिवर आपण... पाण्याखाली एका काचेच्या नळीतुन जाताना आजुबाजुला वेगवेगळे छोटे, मोठे मासे पाहाताना सही वाटतं. मुख्य आकर्षण म्हणजे शार्क!! थोडक्यात 'निमोचा शोध' (Finding Nemo रावं..) मधिल सर्व कलाकारांना प्रत्यक्ष पाहिले!!!
इथे आमचा पहिला दिवस संपला...
दुसर्या दिवशी उठल्यापासुन डोक्यात एकच नाव... 'टिबिडाबो'!! पुन्हा पर्यटक बस घेऊन आम्हि 'टिबिडाबो'ला निघालो. हवा तशी चांगली होती. मधेच ढग येतं, पाउस पडे, पुन्हा उन. आशात आम्हि आमच्या थांब्याला पोचलो. पुढचा प्रवास एकदम सही झाला. पहिल्यांदा जुन्या ट्राम मधुन आम्हि थोडा डोंगर चढला... आजुबाजुला एकापेक्षा एक मस्त बंगले होते. ती ट्राम पण म्हणायला जुनी होती पण माझ्या लक्षात आलं [तळटीप.३] की एका लाकडी झाकणाखाली L.C.D. Display होता... touch screen control सकट!! त्या ट्राम नंतर वर डोंगरावर जाण्यासाठी एक रुळावरचा डबा होता जो सरळ (म्हणजे उभा नाही, वाकडा पण सरळ डोंगरावर) वर चढतो, चढतो म्हणण्यापेक्षा त्याला वरुन जाड तारेने ओढले जाते असे म्हणणे बरोबर. याला इथे 'फनिकुलर' म्हणतात.
वर सरळ आम्हि पोचलो... ढगात!! पावसाळ्यात लोणावळ्याला असतं ना तसं. वरती एक जुनं चर्च आहे. त्यामधल्या लिफ्टने आजुन वरती जाता येतं. वरती आम्हि दोघंच... बाकी जुनं दगडी बांधकाम.. माणसांसारखे पुतळे आणि दाट धुकं... थोडक्यात असं वातावरण की जे मला आवडतं आणि बायकोला नाही... मग काय... तिला लिफ्टशेजारी खोलीत सोडून मी हिंडू लागलो.
या डोंगराची ऊंची ५०० मी हुन जास्त आहे...(हे लक्षात ठेवा की 'बार्सिलोना' समुद्र किनारी आहे) म्हणजे आम्ही ट्राम+फनिकुलर वापरुन जवळपास समुद्रसपाटिपासुन ५०० मी ऊंची गाठली. मग लिफ्टनी ५३८.८७ मी ला गेलो. मग मी एक दगडी जिना आणि मिनारीमधला गोलाकार जिना चढुन ५६४.६३ मी वर पोचलो... आता या उंचीवरुन 'बार्सिलोना' कसे दिसत आसेल याची कल्पनाच करा... मी पण तेच करतोय, कारण मलापण ढगांमुळे काहीच दिसले नाही!! या सर्वांवर येशुचा हात पसरलेका पुतळा आहे (रिओ-दि-जानिरो, ब्रासिल सारखा).
आता एक अविस्मर्णीय अनुभव घेउन आम्हि दुसरा अविस्मर्णीय अनुभव घ्यायला निघालो!!
यस.. बार्सिलोना फुटबॉल क्लब!!!
मला तसा फुटबॉल खेळ पाहायला आवडतो... त्याच्या इतिहास-भुगोलात तेवढा मला रस नाही, जास्त खेळाडूंची नावं देखिल माहिती नाहित... त्यामुळे भित भितच ग्राउंड टुरची प्रत्येकी १८ युरेची तिकिटे काढली. पण पैसा वसुल अनुभव होता. ते भव्य मैदान... १ लाख प्रेक्षकांनी भरल्यावर काय वाटत असेल याचा अंदाज बांधणे अशक्य...
... एका दिवसासाठी एवढा अनुभव चिक्कार झाला नाही?!!
तिसरा दिवसः
आमचा पास संपलेला, अजुन बघायच्या गोष्टी होत्या - १९९२ ऑलेम्पिकचे मैदान, फोर्ट माँजुइक आणि बीच!! साध्या बसने ऑलेम्पिक मैदानापाशी पोचलो. आता बार्सिलोना फुटबॉल क्लबचे मैदान बघितल्यावर यात काय खास? पण नाही... इथे ऑलेम्पिकची communication antina पाहाण्यासारखी आहे. ऑलेम्पिकच्या ज्योतिसारखा त्याचा आकार आहे.
फोर्ट माँजुइकला जाण्यासाठी cable car आहे (आजुन एक वाहन प्रकार!!) पण काही कारणासाठी ती बंद होती.... फोर्ट माँजुइक पाहायला आम्हि परत येणार आहोत!!इथुन आम्हि निघालो बीचकडे. थंडी असल्यामुळे तसा ऑफ सिझन, त्यामुळे बीचवर जास्त कुणी नव्हते. पण या अविस्मर्णीय तीन दिवसांनंतर बार्सिलोनाला टा टा करायला हे ठिकाण चांगलं होतं.
पुढच्या दिवशी आम्हि मॅद्रीदला पोचलो. आता बार्सिलोना बद्दल एवढ लिहिल्यावर मॅद्रीदबद्दल काय लिहायचे हा प्रश्णच आहे. इथे आम्हाला फक्त एक पुर्ण दिवस होता.... तो देखिल जास्त झाला. आता मॅद्रीदची आठवण म्हणजे तेथिल भारतीय हॉटेलमधे केलेले भरपेट जेवण (पाच दिवसांनंतर योग आला होता) मॅद्रिद मधे बर्याच जुन्या इमारती आहेत. एक प्रसिद्ध संग्रहालेय आहे. बास... तुम्हाला कधी चान्स मिळाला तर बिनधास्त मॅद्रीदचा प्रवास नाकारा!!! 'बैलांच्या लढाया' (Bul Fighes) पाहायच्या आसतील तर मॅद्रिदला जरुर या, पण ते उन्हाळ्यात.
पेटपूजा
आम्ही दोघे तसे शाकाहारी. अगदी 'मोडेन पण वाकणार नाही' मधले नाही. पण इथे (म्हणजे 'पॅरिस'मधे, जिथे सध्या काम करतोय) कॅन्टिनमधे मी जे काय चांगल 'दिसेल' ते खातो. पण हॉटेल मधे order करायचे धाडस होत नाही... काय माहिती काय निघेल. स्पेनमधे मसाल्यांचा वापर पॅरिसहुन जास्त होतो. त्यामुळे आपल्याला (भारतियांना) आवडेल इथलं जेवण. पण आम्हि पिझ्झा / बर्गर / स्पागाटी वरच होतो. त्यामुळे स्पॅनिश जेवणाचा जास्त काही अनुभव नाही.
भाषा:
आता पॅरिसमधे राहुन फ्रेंच माहिती झाली.. german देखिल खास उच्चारांमुळे ओळखु येते. वर सांगितेल्या प्रमाणे बार्सिलोनामधे 'कॅटेलुनियन' भाषा बोलतात... ह्याचे साम्य फ्रेंच आणि स्पॅनिश या दोन्ही भाषांशी आहे. स्पॅनिश बद्दल म्हणाल तर, प्रत्येक शब्दाच्या शेवटी 'आ' किंवा 'ओ' असलं कि झालं. वरतीच बघा ना 'कॅटेलुनिआ', 'टिबिडाबो', 'ओला' (hola म्हणजे hi), 'साग्राडा फॅमेलिआ', सोर्टिडा (म्हणजे exit)... त्यामुळे ऐकताना मजेशिर वाटतं.
पण बार्सिलोनाला तोड नाही... पुन्हा संधी मिळाली तर जाणार आहे बार्सिलोनाला, बीच आणि माँजुइकची cable car राहिली आहे ना अजुन!!
Practical Info:
Airlines: Vueling (Good value for money)
Hotel: through HRS (Very good)
Barcelona: tourism dept, tourist bus, metro (take T-10, ten journeys in bus-metro, multi-person use allowed, take zone 1)
Madrid: metro, tourist bus
Minimum days needed: Barcelona=3, Madrid=1
[टिप.१] नाताळ म्हणजे ख्रिसमस बरं... मला 'नाताळ' हा शब्द मराठी वाटायचा, पण ख्रिसमसला फ्रांसमधे 'नोएल' तर स्पानिशमधे 'नदाल' म्हणतात!
[टिप.२] ते विमान फारच स्वस्त होते... सामान चेक्-इन कारायचे आसेल तर १० युरो जास्त... ऑनलाइन चेक्-इन करताना, जर तुम्ही तुमची जागा निवडली तर ३ युरो...
[टिप.३] माझं रक्त मेक्यानिकल इंजिनियरचे आसल्याने (आता भले का कोडींग करत आसेन) मला गोष्टी कशा चालतात याबद्दल नेहमीच कुतुहल असते. (हो.. अगदी लहानपणीपासुन.. कुठलाही खेळ आणला की आधी तो उघडून बघायचा... कसा चालतो ते बघायला!! ह्या ट्राममधे चालकाच्या इथे एक छोटा गट्टू होता, त्यावर पाय दिला तरच ट्राम चालत असे. ह्या प्रकारची सुरक्षा सर्व रेल्वे/मेट्रो मधे असते. त्याला Dead man's switch म्हणतात.